"माझे प्रिय मित्र"


प्रिय मित्रांनो, 
             खूप जनांच्या आयुष्यात हा क्षण योतोच. आयुष्यात एखादी नवीन गोष्ट घडते आणि आपण कधी त्यांच्यासोबत घडत जातो याची जाणीवसुद्धा होत नाही. असाच हा प्रवास होता. या प्रवासात काही कही गमावले तर कही कमावलेसुद्धा. जे गमावले त्यापेक्षा जे मिळाले ते अमूल्य होते. हा प्रवास आम्हा सगळयांसाठी एक अविस्मरनीय होता. हा प्रवास होता एक नव्या मैत्रीचा, नव्या भविष्याचा, नव्या प्रेमाचा आणि नव्या तत्वांचा...
              तीन वर्षापुर्वी सुरु झालेली आमची मैत्री आजही आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोलाचे स्थान ठरते.  आज आम्ही सगळे वेगवेगळया क्षेत्रात शिकतो, काम करतो पण आजही आम्ही एक आहोत, जीवनात खूप मित्र आले आणि गेले पण आम्हाला आजही एकमेकांची गरज आहे.
             आज सगळे एकमेकांपासून खूप लांब राहतात पण काहीतरी निमित्त आम्हाला पुन्हा एकत्र आणतेच आणि आम्हाला याचचं नवल वाटते. ही विडियो माझ्या त्या मित्रांसाठी ज्यांनी माझ्या प्रत्येक सुख-दुखात मला साथ दिली, त्यांच्यासाठी ज्यांनी मला नेहमी यशाचा मार्ग दाखवला.
माझे साथी, माझ्या आयुष्याचे सारथी...म्हणजेच  "माझे प्रिय मित्र"

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"


फक्त तुझ्यासाठी, 

आपल्या आयुष्यात एकच दिवस असा असतो ज्याचा आपणच नाही तर आपले मित्रसुद्धा या दिवसाची वाट बघत असतात आणि तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस. हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा असतो आणि संपूर्ण वर्षात हाच एक दिवस असतो जो आपल्या मनासारखा जावा अशी इच्छा असते आणि तो मनासाराखाच साजरा होतो. यात सगळ्यात जास्त त्रास होतो तो फ़क्त मित्रांना, आपल्यासाठी गिफ्ट काय घेयाचे हेच कळत नाही.
                    असाच एक दिवस, संघातील सर्वात लाडक्या आणि आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस होता. आणि काहीच कळत नव्हते की गिफ्ट काय घेयाचे. आम्ही खूप विचार केला पण काही सुचलेच नाही. उद्या वाढदिवस आहे आणि अजून आम्हला गिफ्ट सुचत नव्हते. तीला कोणती गोष्ट द्यावी जी तीला नेहमी आठवणीत राहील. आणि निर्णय झाला, मला शोर्ट फिल्म बनवीता येते, संपूर्ण वर्षात तीचे खूप फोटो आणि विडियो होते. विचार केला एक छानशी शोर्ट फिल्म बनवावी.
                    मी आणि माझा मित्र, आम्ही रात्री १२ वाजता ही फिल्म बनवायला घेतली आणि डोळ्यासमोर मोठे प्रश्न उभे झाले. या फिल्म मध्ये लिहायचे काय ? त्यात कोणता संदेश लिहायचा ? आणि याचे उत्तर आम्हाला रात्री १.३० वाजता मिळाले. आता आम्ही तयार होतो फिल्म बनावीन्यासाठी. आम्ही रात्रभर जागून  स. ६.३० वाजता पूर्ण केली.
                   जेव्हा ती फिल्म बर्थडे गर्लला दाखवली तेव्हा तीला खूप आवडली तसेच संपूर्ण संघ खूप भावनावश झाला होता. ही विडियो आजही आम्ही बघीतली तर आम्हाला खूप बरे वाटते. तीच्यासाठी ही विडियो खरच अविस्मरनीय आहे. असं म्हणता येईल की माझ्या आयुष्यातील ही खूप छान आणि सर्वात सुंदर विडियो म्हणता येईल...
त्या माझ्या मैत्रिणीला माझ्या कडून "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"

"How To Make Effective Presentation?"


प्रिय मित्रांनो,
                    आपण सगळे वेगवेगळया क्षेत्रात काम करतो आणि हे काम करत असताना नकळतपणे स्वताला दुसा-यासमोर सादर करत असतो. स्वताला सादर करताना जे कोशल्य वापरतो ते खूप महत्वाचे असते. कोशल्य सगळयांकड़े असतात पण ते वापरतात कसे याचाच अर्थ म्हणजे सादरीकरण... 
स्वताला इफेक्टिवपणे सादर कसे करावे याकरीता सादर करीत आहोत एक अद्वितीय सेमिनार 
"How To Make Effective Presentation?" 



स्वताला सादर करताना...
संघाने काम करत असताना...
संघाचे नेतृत्व करताना... 
संघाचे नेतृत्व करताना...
मान्यवारंचे मार्गदर्शन...

लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा - Meena Lama


१४ फेब्रुवारी, म्हणजे प्रेमाचा दिवस पण याच दिवशी जर कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्या दिवसाची गोष्ट काही निराळीच असते.

                      माझ्या हस्ते बनवीण्यात आलेली एक सुंदर भेट जी एक पत्नीने आपल्या पतीसाठी बनवीली आहे. ही Video बनवीत असताना खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. लग्ना नंतर सात वर्षे झाली पण आजही त्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. खूप कमी लोग आहेत ज्यांच्या आयुष्यात एवढे प्रेम करणारी माणसे असतात. 

                       तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळंवळण लागलं.  कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडलेमी प्रथम तुला होकार दिला ,तेव्हाही मला वाटत नव्हतं ,              की मी प्रेमात पडले आहेया 14 फेब्रुवारीलाआपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झालीपण अजूनही आपण      नवीन असल्यासारखंवाटतंया तीन वर्षांत बरंच काही घडून गेलंथोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरीआपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाहीआपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलंआहे , की  फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतंतूमाझ्यासाठी काहीच केलं  नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काहीकेलं आहेसआज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण   श्रेय तुलाच आहेआज आपण अशावळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाहीआपला विश्वास , आपलंप्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहेआपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपणएकत्र आहोत

                      तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे.आपण        एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेतपण कोणत्याही अटीआणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाहीप्रेमाला कधीही मोजमाप नसतंफक्तभरपूर प्रेम करत राहायचं असतंकधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमीनाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांगखरंच मलामाझं प्रेम व्यक्त करता येत नाहीतुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाहीतूम्हणतोस ना , काहीतरी लिहित जाज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहूनव्यक्त करता येतातम्हणून हे फक्त तुझ्यासाठीआत्तापर्यंत तू मला खूप काहीदिलंसमला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंसआता फक्त एकच मागणं आहे, 'हृदयाचा ठोका चुकला तरीतू मात्र चुकू नकोसप्रेमाचं नातं परीसाथ कधी सोडूनकोस... 

               मी आणि माझ्या संपूर्ण संघाकडून मीना आणि राज यांना त्यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा... त्यांचे प्रेम हे असेच कायम स्वरूपी रहावे आशा माझ्या शुभेच्छा....

प्रगतीचा एक्स्प्रेस वे म्हणजे मराठी युवकांना रिचार्ज करणारे पुस्तक - डॉ. नरेंद्र जाधव



मराठी उद्योजकांनी विशेषत तरुणांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून आपली आíथक प्रगती केली पाहिजे. जुन्या मानसिकतेचा पगडा अजूनही अनेक मराठी लोकांवर आहे. ही कोती मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याला हवा तेवढा वेग नाही. अशावेळी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी लिहिलेले प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक म्हणजे तरुण मराठी उद्योजकांना अगदी योग्य वेळी रिचार्ज करणारे पुस्तक आहे, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. जीवनरंग प्रकाशनने तयार केलेल्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जाधव, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी यांच्या हस्ते ताजमहाल हॉटेलमध्ये काल झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की गरिबीचे उदात्तीकरण मराठीत सर्वाधिक आहे. आपल्या काही म्हणीही गरिबीचेच समर्थन करतात. गरिबांनी गरीब राहावे म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे. खरे तर दारिद्ऱ्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे  मनोदारिद्रय़. ते अगोदर दूर व्हायला हवे. म्हणून बदलत्या मराठी मानसिकतेची चर्चा करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योगात दूरदृष्टी आणि वेगळे काही करण्याची प्रेरणा आवश्यक असते.  उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असावे लागते. त्यात त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस लागत असतो. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम करताना मला उद्योगक्षेत्रात जे अनुभव आले होते, त्याचा पुनप्रत्यय मला नितीन पोतदारांचे हे पुस्तक वाचताना आला. मराठी मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. या पुस्तकामुळे उद्योगाचा एक्प्रेस वे अधिक एक्स्प्रेस  होईल. उद्योगाच्या अखंडीकरणासाठी आणि सातत्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा श्री. वाय. एम. देवस्थळी यांनी केली. ते म्हणाले की लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणारी दृष्टी उद्योजकाकडे हवी. सर्वोत्तमाचा ध्यास धरून त्याच्या पूर्ततेचा प्रयत्न करणे आणि सर्वसमावेशक व पारदर्शकता याच्या जोडीला आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे आणि आत्मपरिक्षण करण्याचे कसबही त्याच्यात असायला हवे.
या गोष्टी जर उद्योगात असतील तर कुटुंबाने चालविलेला उद्योग आणि व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून केलेला उद्योग यात फरक करता येणार नाही. या दोन उद्योगात फरक करणे मला मान्य नाही. मराठी माणूस उद्योगात कसा स्थीरावला आहे, याचे विवेचन  कुमार केतकर यांनी सहकारक्षेत्राचा हवाला देऊन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्योजकता नाही, असे नाही. तो एक न्यूनगंड आहे. आपल्याकडे अशिक्षित आणि अल्पशिक्षितांनीही शतकापूर्वी यशस्वी उद्योग केले आहेत आणि करीतही आहेत. पण आता नोकरीमुळे त्यांच्या अंगभूत गुणांवर बुरशी चढली आहे. ती बुरशी काढून टाकून त्याच्याखाली दडलेले सत्य जाणले पाहिजे.
पुस्तकाच्या प्रयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट करताना नितीन पोतदार म्हणाले की गेल्या २३ वर्षांत मी जागतिक स्तरावरचे अनेक उद्योगक्षेत्रातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. त्यात जातीचा, भाषेचा प्रश्न कुठेच डोकावत नाही. एकतर उद्योजक असतो किंवा उद्योजक नसतो. मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, असे सर्वेक्षण कोणी आणि केव्हा केले? चाकरमानीचा लेबल आपण स्वत:वर का लादून घेतो? येणारे शतक हे ज्ञानाधिष्ठीत असणार आहे. तेव्हा दोन दशकांसाठी तरी आपण आपले चुकीचे समज बाजूला ठेवूया आणि आताच्या महत्त्वाकांक्षी युवकांवर चाकरमानीचा शिक्का मारू नका. त्यांना फुलू द्या. कारण मराठी माणसाचा विश्वासाहार्यता हा ब्रण्ड आहे. हा ब्रॅण्ड पुढे नेण्याची गरज आहे. मला माझ्या क्षेत्रात आलेले अनुभव मी समाजापुढे ठेवले आहेत. आपणाला आलेले अनुभवही आपण तरुणांसमोर ठेवून मराठी उद्योजकांची एक पिढी निर्माण करायला हातभार लावू या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनरंग प्रकाशनचे संजय गोविलकर यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की मराठी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम जाणून ताजमहाल हॉटेलमध्ये घेण्यात आला. २६/११ च्या काळरात्रीनंतर आपण याच ठिकाणी पुन्हा भारतीय म्हणून एक झालो. त्याचा संदर्भ आणि उद्योगक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटांच्या वास्तूत हा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर गाडगीळ यांनी केले. यावेळी  द.म.सुकथनकर, एस.बी.आय.इन्सुरन्सचे अध्यक्ष  अशोक प्रधान, टाटा रिटेल इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष  दीपक देशपांडे, नंदकिशोर देसाई, कॅमलिनचे  सुभाष दांडेकर,  श्रीराम दांडेकर,  सचिन जकातदार,  सुनील रोहोकले, अनेय खरे,  उपेंद्र कुलकर्णी,  निखील नाईक,  नितीन  वेद्य,  उदय निरगुडकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व उद्योगपतीं यावेळी उपस्थिती होते. प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक www.bookganga.com या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

एडिटिंगमध्ये रमलेली


नमस्कार,

जेव्हा जेव्हा मी कही विडियो बनावीतो त्यावेळेस वाटत असे की जे मी क्षेत्र निवडले आहे त्यात माझे करिअर होणार की नाही ? पण या बातमी नंतर असं वाटते की माझा एडिटिंग या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. 


अशाच एक, गायत्री कोकजे यांची कथा. एडिटिंगमध्ये रमलेली

काहीतरी ऑफबीट करण्याच्या नादात आपल्या हाताशी किंवा सभोवताली असलेल्या करिअरकडे दुर्लक्ष  जातं. बऱ्याच उशिराने लक्षात येतं, की अरे हेच तर हवं होतं आपल्याला..! असाच काहीसा अनुभव भक्ती मायाळू हिलाही आलाय. 


भक्तीचे वडील म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त. त्यांनी या क्षेत्रात नावं कमावलं असलं, तरी त्यांची मुलगी म्हणून तिचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आपलं करिअर काहीतरी 'एक्स्ट्रा ऑडिर्नरी' असायला हवं, हे तिच्या मनात पक्कं होतं. फक्त वेगळं काहीतरी करायचं ठरवताना नेमकं करायचं काय, हेच तिला कळत नव्हतं. तिच्या कन्फ्युज्ड् माइण्डमध्ये करिअरविषयी कितीतरी प्रश्नांची लिस्ट तयार झाली होती. शेवटी तिला उमगलं, हेच तर आपल्याला हवं होतं. अखेर ती या क्षेत्राकडे वळली. भक्तीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म एडिटिंग क्षेत्रात प्रवेश केला. आता ती यात चांगलीच रमलीय. मोठ्या-मोठ्या दिग्दर्शकांच्या असाइन्मेंट तिच्याकडे येताहेत आंणि लोक तिचं काम अॅप्रिशिएटही करत आहेत. 


सीआयडी', 'हसरते', 'सुरभी' या सीरिअल्सचे काही एपिसोड, 'प्रपंच', 'माझिया प्रियाला प्रित कळेना' यासाख्या मराठी सीरिअल्सच्या एडिटिंगची जबाबदारी तिने पार पाडलीय. यासोबत केदार शिंदे यांचा 'बकुळा नामदेव घोटाळे', 'झूम झॅम झूम', अक्षय दत्तचा नुकताच रिलिज झालेला 'आरंभ' अशा अनेक सिनेमांचं एडिटिंग तिने केलं आहे. 


या क्षेत्राविषयी सांगताना ती म्हणते, 'फिल्म एडिटिंगमधल्या काही गोष्टी कळायला मला थोडा वेळ लागला. मी जेव्हा यात काम करायचं ठरवलं, तेव्हाच मी या गोष्टीत लक्ष घालायला लागले. बाबांनीही माझ्या करिअरनिवडीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी जोपर्यंत काही ठरवत नाही, तोपर्यंत त्यांनीही कधी मला फोर्स केला नाही. अर्थात, प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शनही करायचे. सुरुवातीला फिल्म एडिटिंगमधील काही गोष्टी माझ्या डोक्यावरनं जायच्या. एडिटिंगमधल्या टेक्निकल बाबी मला समजायच्या नाही. याचं मला जाम टेन्शन असायचं. जेव्हा मला या गोष्टी समजायला लागल्या, तेव्हा कुठे या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. याशिवाय, स्त्रियांना टेक्निकल गोष्टीतलं काही कळत नाही असा एक गैरसमज असतोच. माझ्या सहकाऱ्यांच्या मनातला हा गैरसमज मी जेव्हा दूर केला, तेव्हाच मला माझ्या कामाबाबत समाधान वाटायला लागलं. 


या क्षेत्रात स्त्री म्हणून तशा अडचणी नाहीत. पण, मी जेव्हा नविन काही गोष्टी शिकत होतेे, तेव्हा स्त्री म्हणून मला मर्यादा जाणवायच्या. ती मर्यादा म्हणजे मुख्यत: वेळेची असे. आम्ही जेव्हा एडिटिंग रात्र-रात्र करायला बसायचो, तेव्हा कधी कधी घाबरायला व्हायचं. स्त्री म्हणून मी काही सूट तर घेत नाही ना... या सहकाऱ्यांचा माझ्याविषयी गैरसमज तर होणार नाही ना... हे प्रश्न मला सतवायचे. हळूहळू मी यात सेट झाले. जसजशी रमत गेले तसतशी कामात खूप मजा यायला लागली आणि आता तर चांगलीच सेट झाली आहे.' 

गायत्री कोकजे

माझा T.Y.B.Com चा शेवटचा दिवस.


वर्ष कधी संपले कळलेच नाही. या एक वर्षात खुप कही नवीन शिकलो आम्ही, मित्रांसोबत मस्ती, एखादा प्लान बनवून बाहेर फिरायला जाणे, एकमेकांना मदत करुन अभ्यास करणे. खुप धमाल केली.
आणि आज शेवटचा दिवस ! 

हा दिवस पुन्हा येणार नाही याची खात्री सर्व मुलांना होती आणि हा दिवस सर्वांच्या आठवणीत असावा यासाठी मस्त पार्टी करण्यात आली.  
 
Jumbo... © 2010 | Designed by Trucks, in collaboration with MW3, Broadway Tickets, and Distubed Tour