"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"


फक्त तुझ्यासाठी, 

आपल्या आयुष्यात एकच दिवस असा असतो ज्याचा आपणच नाही तर आपले मित्रसुद्धा या दिवसाची वाट बघत असतात आणि तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस. हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा असतो आणि संपूर्ण वर्षात हाच एक दिवस असतो जो आपल्या मनासारखा जावा अशी इच्छा असते आणि तो मनासाराखाच साजरा होतो. यात सगळ्यात जास्त त्रास होतो तो फ़क्त मित्रांना, आपल्यासाठी गिफ्ट काय घेयाचे हेच कळत नाही.
                    असाच एक दिवस, संघातील सर्वात लाडक्या आणि आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस होता. आणि काहीच कळत नव्हते की गिफ्ट काय घेयाचे. आम्ही खूप विचार केला पण काही सुचलेच नाही. उद्या वाढदिवस आहे आणि अजून आम्हला गिफ्ट सुचत नव्हते. तीला कोणती गोष्ट द्यावी जी तीला नेहमी आठवणीत राहील. आणि निर्णय झाला, मला शोर्ट फिल्म बनवीता येते, संपूर्ण वर्षात तीचे खूप फोटो आणि विडियो होते. विचार केला एक छानशी शोर्ट फिल्म बनवावी.
                    मी आणि माझा मित्र, आम्ही रात्री १२ वाजता ही फिल्म बनवायला घेतली आणि डोळ्यासमोर मोठे प्रश्न उभे झाले. या फिल्म मध्ये लिहायचे काय ? त्यात कोणता संदेश लिहायचा ? आणि याचे उत्तर आम्हाला रात्री १.३० वाजता मिळाले. आता आम्ही तयार होतो फिल्म बनावीन्यासाठी. आम्ही रात्रभर जागून  स. ६.३० वाजता पूर्ण केली.
                   जेव्हा ती फिल्म बर्थडे गर्लला दाखवली तेव्हा तीला खूप आवडली तसेच संपूर्ण संघ खूप भावनावश झाला होता. ही विडियो आजही आम्ही बघीतली तर आम्हाला खूप बरे वाटते. तीच्यासाठी ही विडियो खरच अविस्मरनीय आहे. असं म्हणता येईल की माझ्या आयुष्यातील ही खूप छान आणि सर्वात सुंदर विडियो म्हणता येईल...
त्या माझ्या मैत्रिणीला माझ्या कडून "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या"

0 comments:

Post a Comment

 
Jumbo... © 2010 | Designed by Trucks, in collaboration with MW3, Broadway Tickets, and Distubed Tour