एडिटिंगमध्ये रमलेली


नमस्कार,

जेव्हा जेव्हा मी कही विडियो बनावीतो त्यावेळेस वाटत असे की जे मी क्षेत्र निवडले आहे त्यात माझे करिअर होणार की नाही ? पण या बातमी नंतर असं वाटते की माझा एडिटिंग या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. 


अशाच एक, गायत्री कोकजे यांची कथा. एडिटिंगमध्ये रमलेली

काहीतरी ऑफबीट करण्याच्या नादात आपल्या हाताशी किंवा सभोवताली असलेल्या करिअरकडे दुर्लक्ष  जातं. बऱ्याच उशिराने लक्षात येतं, की अरे हेच तर हवं होतं आपल्याला..! असाच काहीसा अनुभव भक्ती मायाळू हिलाही आलाय. 


भक्तीचे वडील म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त. त्यांनी या क्षेत्रात नावं कमावलं असलं, तरी त्यांची मुलगी म्हणून तिचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आपलं करिअर काहीतरी 'एक्स्ट्रा ऑडिर्नरी' असायला हवं, हे तिच्या मनात पक्कं होतं. फक्त वेगळं काहीतरी करायचं ठरवताना नेमकं करायचं काय, हेच तिला कळत नव्हतं. तिच्या कन्फ्युज्ड् माइण्डमध्ये करिअरविषयी कितीतरी प्रश्नांची लिस्ट तयार झाली होती. शेवटी तिला उमगलं, हेच तर आपल्याला हवं होतं. अखेर ती या क्षेत्राकडे वळली. भक्तीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म एडिटिंग क्षेत्रात प्रवेश केला. आता ती यात चांगलीच रमलीय. मोठ्या-मोठ्या दिग्दर्शकांच्या असाइन्मेंट तिच्याकडे येताहेत आंणि लोक तिचं काम अॅप्रिशिएटही करत आहेत. 


सीआयडी', 'हसरते', 'सुरभी' या सीरिअल्सचे काही एपिसोड, 'प्रपंच', 'माझिया प्रियाला प्रित कळेना' यासाख्या मराठी सीरिअल्सच्या एडिटिंगची जबाबदारी तिने पार पाडलीय. यासोबत केदार शिंदे यांचा 'बकुळा नामदेव घोटाळे', 'झूम झॅम झूम', अक्षय दत्तचा नुकताच रिलिज झालेला 'आरंभ' अशा अनेक सिनेमांचं एडिटिंग तिने केलं आहे. 


या क्षेत्राविषयी सांगताना ती म्हणते, 'फिल्म एडिटिंगमधल्या काही गोष्टी कळायला मला थोडा वेळ लागला. मी जेव्हा यात काम करायचं ठरवलं, तेव्हाच मी या गोष्टीत लक्ष घालायला लागले. बाबांनीही माझ्या करिअरनिवडीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी जोपर्यंत काही ठरवत नाही, तोपर्यंत त्यांनीही कधी मला फोर्स केला नाही. अर्थात, प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शनही करायचे. सुरुवातीला फिल्म एडिटिंगमधील काही गोष्टी माझ्या डोक्यावरनं जायच्या. एडिटिंगमधल्या टेक्निकल बाबी मला समजायच्या नाही. याचं मला जाम टेन्शन असायचं. जेव्हा मला या गोष्टी समजायला लागल्या, तेव्हा कुठे या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. याशिवाय, स्त्रियांना टेक्निकल गोष्टीतलं काही कळत नाही असा एक गैरसमज असतोच. माझ्या सहकाऱ्यांच्या मनातला हा गैरसमज मी जेव्हा दूर केला, तेव्हाच मला माझ्या कामाबाबत समाधान वाटायला लागलं. 


या क्षेत्रात स्त्री म्हणून तशा अडचणी नाहीत. पण, मी जेव्हा नविन काही गोष्टी शिकत होतेे, तेव्हा स्त्री म्हणून मला मर्यादा जाणवायच्या. ती मर्यादा म्हणजे मुख्यत: वेळेची असे. आम्ही जेव्हा एडिटिंग रात्र-रात्र करायला बसायचो, तेव्हा कधी कधी घाबरायला व्हायचं. स्त्री म्हणून मी काही सूट तर घेत नाही ना... या सहकाऱ्यांचा माझ्याविषयी गैरसमज तर होणार नाही ना... हे प्रश्न मला सतवायचे. हळूहळू मी यात सेट झाले. जसजशी रमत गेले तसतशी कामात खूप मजा यायला लागली आणि आता तर चांगलीच सेट झाली आहे.' 

गायत्री कोकजे

0 comments:

Post a Comment

 
Jumbo... © 2010 | Designed by Trucks, in collaboration with MW3, Broadway Tickets, and Distubed Tour