१४ फेब्रुवारी, म्हणजे प्रेमाचा दिवस पण याच दिवशी जर कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्या दिवसाची गोष्ट काही निराळीच असते.
माझ्या हस्ते बनवीण्यात आलेली एक सुंदर भेट जी एक पत्नीने आपल्या पतीसाठी बनवीली आहे. ही Video बनवीत असताना खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. लग्ना नंतर सात वर्षे झाली पण आजही त्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. खूप कमी लोग आहेत ज्यांच्या आयुष्यात एवढे प्रेम करणारी माणसे असतात.
तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळंवळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला ,तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रुवारीलाआपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखंवाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरीआपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलंआहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तूमाझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काहीकेलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशावळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलंप्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपणएकत्र आहोत.
तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे.आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटीआणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्तभरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमीनाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मलामाझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तूम्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहूनव्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काहीदिलंस, मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे, 'हृदयाचा ठोका चुकला तरी, तू मात्र चुकू नकोस, प्रेमाचं नातं परी, साथ कधी सोडूनकोस...
मी आणि माझ्या संपूर्ण संघाकडून मीना आणि राज यांना त्यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा... त्यांचे प्रेम हे असेच कायम स्वरूपी रहावे आशा माझ्या शुभेच्छा....